खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते अष्टमी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
अष्टमी गावच्या एकतेचे घडले दर्शन
रोहा (रविना मालुसरे) : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या माध्यमातून अष्टमी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विकास कामांचे भूमिपूजन रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते पार पडले. रायगड जिल्हा पालकमंत्री आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. अष्टमी आंबेडकर नगर अंतर्गत रस्ता, अष्टमी मोहल्ला व्यायाम शाळा, सातीआसरा उद्यान, मराठा आळी प्रवेशद्वार, अष्टमी हिंदू स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, प.पु.पांडुरंग शास्त्री आठवले शाळा नूतन वास्तू ,अष्टमी उर्दू शाळा क्रमांक पाच यांचे लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या प्रयत्नांतून विकास कामे करण्यात आली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मधुकरराव पाटील, विजयराव मोरे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, सुरेश मगर, रिदवाना शेटे, महेंद्र गुजर, तहसीलदार कविता जाधव, महेश कोल्हटकर, राजू जैन, अमित उकडे, सारिका पायगुडे, महेंद्र दिवेकर, अनंत देशमुख, सागर भोबड, आफरिन रोगे, गीता पडवळ, अमित मोहिते, रविना मालुसरे, सर्व नगरसेवक व अनेक नागरिक उपस्थित होते. अष्टमी गावातील विविध आळीतील प्रमुख मंडळींची उपस्थिती लक्षणीय होती. विविधतेतुन एकतेचे प्रतीक असलेल्या अष्टमीतील विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमांसाठी असलेली उपस्थिती लक्षणीय होती.