धाटाव येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कष्टकरी शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला

केमिकल युक्त प्रदुषित पाणी सोडून कुंडलीका नदी केली प्रदुषित

धाटाव परिसरातील १४ गाव शेतकरी प्रदुषणाच्या विळख्यात 

रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील धाटाव या गावी पाच दशकापुर्वी कारखाने येणार म्हणून तालुक्यातील नागरीकांना एक मोठा आनंद व आशेचा किरण गवसला अशी समज करुन दिली होती. पण आजची परिस्थिती पहाता पदरी निराशाच आली आहे. महाराष्ट्र औद्योगिकीकरण धाटाव येथे झाले. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा विळखा बसला. कामगार तिस तिस किलोमीटर वरुण तरुण रोजंदारी करीता सायकलवर कंपनी ते घरी असा प्रवास करत असे. कंपन्यांचे प्रस्थापीत नियम सर्वसामान्यांना माहिती नसल्याने स्थानिकांना कंपन्या वेठीस धरु लागली.तेथील स्थानिक राजकीय नेते यांचे सहकार्य व सपोट कंपन्यांना असल्याने काही कामगार डोक खुपसण्याचा प्रयत्न करावयास गेल्यास त्यांना दंडीलशहाचा चटका मिळाला जाई.मग ते डोके चालवणारे नाउमेद होऊन तटस्थ रहात असत.असाच प्रकार चालु राहिल्याने कंपण्यांचा वरचस्व वाढत गेला आणि नियंत्रण ढासळला. कधीही हवा, गॅस, सोडणे, प्रदुषित पाणी, नदीनाल्यातून सोडणे हे प्रकार दिवसेंदीवस वाढू लागले.याचा परिणाम नदीतील मासे, नदीतील पाणी ज्या शेतीमध्ये जातअसे त्या शेतकऱ्यांची शेती नापीक होत असे. परंतु परिस्थिती अज्ञाणी स्वरुपाची म्हणून तेथील शेतकरी व मच्छीमार अशिक्षित असल्याने याचा फायदा एम्.आय्.डी.सी.ने घेतला म्हणायला हरकत नाही. या परिस्थितीचा अढावा त्यावेळीचे शेतकरी का.पक्षाचा नेते व्हि.टी.देशमुख,व मच्छीमार संघटणेचा नेते भाई बंदरकर यांना कळवळा आला. तो दीवस आम्हाला आजही आठवतोय.असे एका जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे.एम्.आय्.डी.सी.ने केमिकल कंपन्यांचा प्रदुषित पाणी खारगांव आरे येथे खुल्ला सोडला होता. त्याला लाकडी बुच मारुन बंद केला. त्यावेळेस हजारोंच्या संखेने शेतकरी व मच्छीमार बंधू या मोर्चात बोट, होड्यांसह हजर होते. बुच मारुन एम्.आय.डी.सी.धाटाव येथे आंदोलन केले आणि रोहा येथे मोठी सभा घेऊन सभा आटोपून बिना चहा नाश्ता, करता जमलेला जनसागर आप आपल्या घरी आला.त्या मिटींगला मी स्वतः होतो असेही त्यांनी सांगितले.पुढे ते म्हणतात की आठ ते दहा दीवसांनी आरे खारगांव या मध्यावरील सांड पाणी पुन्हा लोकांच्या नजरेस पडले. या बाबत पुढे कित्येक छोटी मोठी सभा मोर्चे व्हायचे पण ते निवडणुकांच्या तोंडावर व्हायच्याअन्यथा जैसे थे,बर पुढे एक योजना प्रत्यक्षात माहिती पडली की हे प्रदुषित पाणी मोठ्या समुद्राला म्हणजेच पोसीराबंदर एक टप्पा तेथुन पुढे रेवदंडा असा जल लाईन द्वारे सांड पाणी नेले जाईल.त्या करीता पाईप लाईन ने  न्हेआण करण्याकरिता रस्ता अपेक्षित आहे.म्हणुन माणगाव निवासी प्रांत साहेबांनी प्रत्येक्ष गोफण गावात येऊन भेटी घेतल्या व शेतकऱ्यांना आपली दोन तिन गुण्ठा जागा जात असेल तर जाऊद्या पण आपण जागा द्या अन्यथा पाइपलाइन रोहा मुरुड रस्तांनी जाणार मग तुमच्या विहीरी तळावे खराब होतील कधीकाळी पाणी लिकेज झालेतर या उद्देशाने लोकांना प्रस्ताव मंजूर झाला व सहमती दर्शवली. यातुन लोकांचा एक फायदाही होणार होता की खारशेतीमध्ये जायला पक्का रस्ता होईल, समुद्रातील पाणी शेतात येणार नाही व शेती सुपीक होईल.पण तस काहीच झाले नाही.असे येथील शेतकरी व ग्रामस्थ म्हणत आहेत.तर उलट गोड बोलून शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला.तो असा की आरे जवळचा सोडलेला प्रदुषित पाणी गोफण खारजमीनी लगत आणून ठेवला आणि रस्ता बस्ता काहीही न करता मोघाम जागा विना मुल्य औद्योगिक वसाहतीच्या नावे प्रांतांच्या आदेशाने लागलीतर लागली.वर खारजमीनीत सोडलेला पाणी शिरुन तिनशे एकर जमीन आज रोजी नापिक होऊन शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे.असे शिवसेनेचे चणेरा विभाग युवा कार्यकर्ते दिनेश पांडूरंग कडू यांचे म्हणणे आहे.तसेच कुंडलीकेच्या दोन्ही तिरावरील २६ गावांसाठी लक्षवेधी या शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे कामी २००४ साली आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी या योजनेचा शुभारंभ केला होता.त्यावेळी हा प्रकल्प चार करोड होता.पण प्रकल्प अर्धवट राहील्याने त्याची वाढ १९ करोडवर केली तरी आज तागायत ठराविक जवळपासची गावे वगळता आमच्या गोफणला पाणीच नाही.असेही तेथील शे.का.पक्षाचे  विभागीय चिटणीस.शशिकांत कडू यांनी सांगितले.सदरील परिस्थिती पहाता या परिसरातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला असुन प्रदुषण नियंत्रण मंडळाने याचा गांभीर्याने विचार करावा. 

कंपन्यातून केमिकल युक्त प्रदुषित पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने याचा परिणाम मृतमच्छी व शेतीवर झालेला असल्याने शेती पुर्ता नापीक झाली त्याचा परिणाम आज येथील शेतकरी व मच्छीमार बंधू यांना भोगावे लागत आहे.याचा गांभीर्य समंधीत स्थानिक प्रशासनाने घेतला पाहिजे.असे मत येथील शेतकरी कामगार पक्षाचे विभागीय युवा कार्यकर्ते अमोल शिंगरे यांचे म्हणणे आहे.सदरील कंपन्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होण्यास जबाबदार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असल्याने रोहा तालुक्यातील मौजे गोफण गावातील शेतकरी व मच्छीमार यांची आज तागायत झालेली नुकसान भरपाई समंधीत स्थानिक प्रशासनाने जाग्यावर येऊन पहाणी करुन तसे पंचनामे करावेत व अंदाजे दहा वर्षांत शेतीची झालेली नुकसान व नापीक झालेली शेतीभरपाई ही एम्.आय्.डी.सी.कडून मिळवून द्यावी. तसेच मच्छीमार यांची होणारी उपासमारीची व्यवस्था करण्यात यावी.असे येथील शेतकरी व मच्छीमार यांची मागणी आहे.

Popular posts from this blog