आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवकांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
रोहा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम
रोहा (रविना मालुसरे) : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद सदस्य,आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा वाढदिवस रोहा तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
आमदार अनिकेतभाई तटकरे यांचा वाढदिवस म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "पर्वणीच"असते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांनी तालुक्याच्या विविध भागात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून आपल्या लाडक्या युवा नेत्याचा वाढदिवस एका सणाप्रमाणे साजरा केला. त्याच धर्तीवर रोहा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीनेही वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना संसर्गाच्या कालावधीत आपल्या जीवाची बाजी लावून जनसेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.या सर्व आरोग्य सेवकांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल सन्मानित करून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा मानस होता.आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेवाडी व नागोठणे येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवकांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
रोहा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमास आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,जामगाव सरपंच प्रशांत म्हशीलकर,दशरथ साळवी सदस्य येरळ, माजी सरपंच शुभांगी पलंगे,सुरेखा पार्टे,कार्यकारणी सदस्य,स्नेहा ताडकर ,सचिव,समीक्षा घावटे, आंबेवाडी पंचायत समिती गण अध्यक्ष,शितल बंगाल पंचायत समिती गण खांब अध्यक्ष कुमार लोखंडे, कांचन वाचकवडे, वृषाली लोखंडे,प्रणाली सानप अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका,वैद्यकीय अधिकारी वरूटे मॅडम,आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमास पेण विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष विलास चौलकर,नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,जेष्ठ नेते शिवरामभाऊ शिंदे, बिपीन सोष्टे, घासे ,जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, उपाध्यक्ष रिचा धात्रक, उपाध्यक्ष सोनाली वाचकवडे, उपाध्यक्ष निष्ठा विचारे,चिटणीस कल्पना टके, शहर अध्यक्ष सुजाता जवके,उपाध्यक्ष प्रतिभा तेरडे, सदस्य नंदा गायकवाड, महाडीक ताई,प्रणाली सानप, तटकरे ताई, सारिका खंडागळे,वैद्यकीय अधिकारी डॉ. आदीत्य शिरसाट अंगणवाडी सेविका,आशा सेविका व वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता.