आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा यांच्यावतीने तहसिलदारांना निवेदन
रोहा (रविना मालुसरे) : रोहा तहसिलदार कविता जाधव यांना आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी निवेदन स्वीकारुन कवळटे आदिवासीवाडी येथील लोकांच्या पुनर्वसनाचा विषय लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा अध्यक्ष श्री. पांडुरंग वाघमारे, सल्लागार सुरेश वाघमारे, सर्वहारा जन आंदोलन चे कार्यकर्ते अंकुश वाघमारे, कातकरी आदिम संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. लहु वाघमारे तसेच कवळटे आदिवासीवाडी ग्रामस्थ चंदर जाधव, किसन जाधव, रामचंद्र पवार, संतोष वाघमारे, नथुराम वाघमारे आदी उपस्थित होते.