शिवसेना पेण विधानसभा अंतर्गत नागोठणे येथे आढावा बैठक संपन्न

मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पेण विधानसभा अंतर्गत बैठकीचे आयोजन नागोठणे येथील मुद्रा हॉटेल येथे करण्यात आले होते.

यावेळी सर्वप्रथम नागोठणे ग्रामपंचायतीचे दिवंगत उपसरपंच शैलेंद्र देशपांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिवसेनेतील निवडून आलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. या बैठकीत उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना किशोर जैन म्हणाले की, आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत आपल्याला जिल्हापरिषदेवर भगवा फडकवायचा आहे त्या साठी आपल्याला एकत्र राहायला पाहिजे. आज आपल्याकडे ऐनघर, वरवठणे सारख्या ग्रामपंचायती आहेत. सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवासेना, महिलाआघाडी आपल्या सोबत आहे. नागोठणे विभागात मिटींग लावायचं खास कारण म्हणजे जे ते उठ सुठ नागोठण्यात येतात, मंत्री येतात, खासदार येतात, आमदार येतात  नेमक कारण काय, आघाडी आहे, युती आहे, सत्ता आमच्या हातात आहे मग अडचण कुठे आहे. मग उठ सुठ नागोठण्यात कशासाठी? मग लक्षात आलं की, शिवसेना एवढी मजबूत झालेली आहे आणि या मजबुती मधले जे काही भुरटे गेलेले आहेत ते प्रत्येकजण आणण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि या भुरटेगिरीचा उत्तर देऊन टाकु आणि म्हणून आजची ही मिटींग येणाऱ्या निवडणुकीसाठी तर आहेच पण या भुरटेगिरीला घाबरायचं नाही असा सणसणीत टोला यावेळी विरोधकांना लावला आणि या साठी एकजूट महत्वाची असल्याचे ते या वेळी म्हणाले.

या आढावा बैठकी साठी प्रमुख उपस्थिती विष्णूभाई पाटील (माजी जिल्हाप्रमुख), सुधीर ढाणे (युवसेना रायगड जिल्हा अधिकारी), संजय भोसले (नागोठणे विभाग प्रमुख) अश्विनी रुईकर (उपजिल्हा संघटिका), दर्शना जवके (पेण विधानसभा संघटिका), गणपत म्हात्रे (रोहा उपतालुका प्रमुख) डॉ. मोलिंद धात्रक (सरपंच नागोठणे) मोहन नागोठणेकर, संजय महाडीक, जितेंद्र धामणसे, दीप्ती दुर्गावले, कलावती कोकले (सरपंच ऐनघर) मनोहर सुटे, रोहिदास लाड, सुप्रिया महाडीक, कल्पना टेमकर, ऋतुजा म्हात्रे (सरपंच वरवठने) प्रशांत भोईर, सतीश डाकी, सुरेश गायकर, (उपसरपंच पाटणसई) नितीन घासे, विना घासे, दीपक दुर्गावले, विक्रम दुर्गावले, नंदू देशपांडे, मंजित लंबाते, इम्रान पानसरे, नामदेव चितळकर, सूर्यकांत गायकवाड, विठोबा शिर्के, ज्ञानेश्वर साळुंखे, अनिल महाडीक, राजा गुरव, संजय पिंपळे, पांडुरंग कामथे, धर्मा भोपी, विजय धामने, छबनीस कोतवाल, बाळू राटाटे, संतोष घाग, युवसेनेचे मंदार कोतवाल, संजय कनघरे, शैलेश चव्हाण, अविनाश भोसले, प्रणव रावकर, ऋत्विज माने आदींसह शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश कांबळे व आभार प्रदर्शन प्रशांत भोईर यांनी केले.

Popular posts from this blog