माणगांव तालुक्यात गोमाता संरक्षण व गो संवर्धन समितीची स्थापना
माणगांव (प्रमोद जाधव) : रायगड जिल्ह्यातील माणगांव, तळा यासारख्या तालुक्यात मागील २ महिन्यापासून सुरू गोवंश हत्येचे सत्र, गोमांसाची तस्करी, गोधनाची तस्करी याला आळा घालण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी माणगांव शहरातील खरे मंगल कार्यालयात माणगांव तालुक्यातील समस्त हिंदू बांधवांची सभा घेण्यात आली या सभेत,मागील दोन महिन्यापासून तालुक्यातील सुरू असलेल्या गोवंश हत्येला कशा प्रकारे आळा घालता येईल अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यानंतर गोमाता संरक्षण व गो संवर्धन समितीची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. यामध्ये समितीच्या अध्यक्षपदी ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर, उपाध्यक्ष परशुराम कोदे, सचिव संजोग मानकर व प्रमोद जाधव, रामजी कदम, भिवा पवार, राजन पाटील यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली व एकूण १७ सदस्यांची कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.लमात्र तालुक्यातील काही विभागातील सदस्य सभेला उपस्थित राहू न शकल्याने कार्यकारिणी मध्ये पुढील सभेत बदल होऊ शकतो असे ॲड. अनिकेत ठाकूर यांनी सांगितले आहे.