बोगस कामांची बिले काढणारा रोहा तालुक्यातील खादाड अभियंता अलिबागमध्ये बदली करून घेण्यास इच्छुक?
रोहा तालुका भ्रष्टाचाराने पोखरला, आता अलिबागमध्ये पण धुमाकूळ घालणार का?
उच्चस्तरिय चौकशी होऊन या अभियंत्याला निलंबीत करणे आवश्यक!
धाटाव/रोहा (किरण मोरे) : बोगस कामांची बिले काढून भ्रष्टाचाऱ्यांना साथ देणारा रोहा तालुक्यातील एक 'चतुर कोल्हा' हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनून राहिला आहे. हा खादाड अभियंता सध्या आपले 'कुकर्म' लपविण्यासाठी रोहा तालुक्यातून अलिबाग तालुक्यात बदली करून घेण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे रोहा तालुका तर भ्रष्टाचाराने पोखरला, मग आता अलिबागमध्ये पण हा धुमाकूळ घालणार का? असा प्रश्न उपस्थित झाल्याने शासनाच्या पैशांची लुबाडणूक थांबविण्यासाठी या अभियंत्याची उच्चस्तरिय चौकशी होऊन त्याला निलंबीत करणे गरजेचे आहे. याच्याकडे 'अभियंता' हे पद म्हणजे 'माकडाच्या हातात कोळीथ' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या अभियंत्याने नेहमीच पदाचा दुरूपयोग करून शासनाचा पैसा लुटायला सुरूवात केलेली आहे. भ्रष्टाचाऱ्यांना साथ देऊन करोडो रूपयांची माया गोळा केली आहे. चुकीच्या मार्गाने मिळविलेल्या पैशांतून अनेक ठिकाणी प्रॉपर्टी उभी केली आहे. तसेच, भ्रष्टाचाराच्या कमाईतून दारू-मटणाच्या पार्ट्या करणे ही तर याच्यासाठी कॉमन गोष्ट झालेली आहे.
रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या हद्दीत तर विकासकामे झालीच नाहीत, परंतु या भ्रष्ट अभियंत्याने तर फक्त कागदोपत्री कामे झाल्याचा दिखावा करून शासनाच्या पैशांची लुबाडणूक केल्याचे उघडकीस आलेले आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत अंदाजपत्रकाप्रमाणे (इस्टिमेंट प्रमाणे) कामे झालेलीच नाहीत, चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने कामे झालेली असताना देखील ती कामे योग्य असल्याचे दर्शवून त्या बोगस कामांची बिले काढली आहेत. अशा प्रकारे या अभियंत्याने शासनाच्याच डोळ्यात धूळफेक केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या पैशांची लुबाडणूक थांबविण्यासाठी या अभियंत्याची उच्चस्तरिय चौकशी होऊन त्याला निलंबीत करणे गरजेचे आहे.