महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्रचे कार्य कौतुकास्पद : पालकमंत्री अदिती तटकरे
रोहा (समीर बामुगडे) : सामाजिक संघटनेच्या माध्यमातून दिपीकाताई चिपळूणकर आणि ज्योती भोकटे यांचे कार्यकौतुकास्पद आहे. आपल्या दोघींचे मनापासुन अभिनंदन करते, महिलांच्या न्यायहक्कासाठी हे कार्यालय आपल्या पुढाकारातून सूरु केलत याच मनस्वी आनंद होत आहे. असे प्रतिपादन राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भुवनेश्वर येथे केले.
महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या श्रीकृष्ण नगर भुवनेश्वर येथील कार्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत व्यासपीठावर तहसीलदार कविता जाधव, वरसे ग्रामपंचायतचे सरपंच नरेश पाटील, सदस्या पाटिल, सारिका नाकती, किशोर पाटील, शांतिशील तांबे, गणेश शिवलकर, अमीत मोहिते, रामचंद्र नाकती, राकेश महामुनी, प्रकाश भोकटे, महिला सुरक्षा संघटनेच्या दिपीकाताई चिपळूणकर कोकण विभाग अध्यक्षा अॅड. स्नेहा राऊत कोकण विभाग उपाध्यक्षा, मनोल गुरव रायगड जिल्हा उपाध्यक्षा, ज्योती भोकटे, रोहा तालुका अध्यक्ष, दिपाली पोरे रोहा तालुका सल्लागार, सुरेखा शित्रे रोहा तालुका सचिव आरती कांबळे रोहा तालुका उपाध्यक्षा, विनिता जंगम शहराध्यक्षा आरती धारप शहर सचिव, विद्या झोलगे, राजश्री पाटील, नम्रता विचारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्ष घरकाम करणाऱ्या महीला, तसेच इतर ठिकाणीं रोजगाराला जाणाऱ्या महीलांसह अनेकींना त्यांच्या विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या अडीअडचणी समस्या अनेक वर्षे आपणं सोडवत आलात. महिलांसाठी महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र हे कर्यालय सूरू करुन आता आपण जास्त संघटीत झालात. कार्यालयाच्या माध्यमांतून महिलांचे प्रश्न सोडवण्यात सोप होणारं आहे. महिलां काम करण्यासाठी ज्या ठीकाणी जातात, तेथे सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे, तिच्यावर कुठे अन्याय होत असेल, वेतन कमी मिळत असेल, काही अडीअडचणी असतील त्या आपल्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत आलात असे गौरवोदगार दिपीकाताई चिपळूणकर यांच्याविषयी बोलताना काढले. महिला सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून ते प्रश्न आता महिला सुरक्षा संघटनेच्या माध्यमातून ते प्रश्न आता प्रखरतेने सोडविण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीत आपण कराल अशी आशा व्यक्त करते. राऊत मॅडम गेले अनेक वर्षे जिल्हयात विविध ठिकाणी शासनाच्या माध्यमातून नुकसाभरपाईची, पुनर्वसन, तसेच अन्याय्य विरोधात नेहमीचं पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात, त्याची भुमिका, त्यांची वकीली नेहमीचं त्यांनी अन्याया विरोधात केलेली आहे. महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र या संघटनेत येणाऱ्या पीडित महिला, त्यांचें घरगुती प्रश्न, नोकरीत व विवीध ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या यावर निश्चीत राऊत मॅडम दिपीका ताई चिपळूणकर ज्योती भोकटे मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त करते, महीला सुरक्षा संघटनेला मनापासून शुभेच्छा देत असताना आपली संघटना अशाच प्रकारे बळकट होत जाओ, मोठ्या प्रमाणात संघटीत होवो. महिलांना अनेक वेळेला वाटतं आपल्या समस्या, अडचणी, त्रास कोणाला तरी जाऊन सांगावे, आपल्या अडचणी मांडल्या जातील सोडवल्या जातील का, ही एक त्यांच्या मनामध्ये मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होते, ती आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढच्या कालावधीत निश्चीत पणाने सोडवली जाईल. महिलेला मनासारखा न्याय मिळेल. ज्या ज्या वेळेला आमची गरज लागेल, मग मी आहे, तहसीलदार मॅडम आहेत अॅड. राउत मॅडम आहेत, वेळोवेळी महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोतच. आपणं अनेक वर्षांपासून समाजीक बांधिलकीतून आपल्याला उपलब्ध असणारे व्यासपीठ आहे, या माध्यमातून आपणं महिलांसाठी उपक्रम राबवत असता. आम्हीं पाहतो आपणं अनेक वेळेला, वर्षानुवर्ष जेष्ठ नागरिक सभागृह, सी. डी. देशमुख टाऊन हॉल मध्ये विविध कार्यक्रम आयोजीत करता, तसेच महिलांना आर्थिक सहाय्य, सहकार्य, तसेच बचतगटा मार्फत विक्री करुण उत्पंन मिळत असतं या सर्व बाबींमध्ये आपणं नेहमीचं लक्ष घातलेलं आहे, अशाच पद्धतीनं यापुढे सुध्दा आपणं संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आशा व्यक्त केली, त्यापुढे म्हणाल्या की, जिथं पर्यन्त आपणं स्वतः प्रश्नांना प्राधान्य देत नाहीत तिथ पर्यंत त्याला हवे तितके महत्व प्राप्त होत नाहीं, त्यामुळें इतरांकडून महत्व मिलत नसेल तर आपण स्वतः कसे महत्व प्राप्त करून घेउन विषय सोडवून घ्यायचा ही सुध्दा कसरत आपल्याला करावी लागते आणि ती केल्या शिवाय बरेच वेळा आपल्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे कुठेही खचून न जाता एक मेकिना जर साथ दिलीत तर नक्किच आपल्या अडीअडचणी आपणं सोडऊ शकता, कारण प्रत्येकीच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी असतात यासाठी सर्वानी एक संघटीतपणें राहणे हि काळाची गरज आहे. असे पालकमंत्री शेवटी म्हणाल्या.