संत निरंकारी ‌‌मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तळा (संजय रिकामे) : ‌संत निरंकारी ‌‌मंडळ चोरिवली यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिल्लीसह महाराष्ट्रात अनेक सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक तसेच वैद्यकीय उपक्रम राबवित ‌‌संत निरंकारी ‌‌मंडळाने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या रायगडच्या 40(अ) झोन अंतर्गत ब्रांच चोरवली ता. तळा यांच्या तर्फे रविवार दिनांक 31.10.21 रोजी सकाळी 9 ते 1.30 वाजेपर्यंत तळा शहरातील कुणबी भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर कोरोना संदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून केले जाणार आहे. रक्त संकलन शासकीय रक्तपेढी अलिबाग रायगड यांच्या मार्फत होणार आहे. 

संत निरंकारी मिशनच्या रक्तदनाचा हा सामाजिक पैलू मनुष्यमात्राच्या मनामध्ये मानवतावादी भावनांना उदयोन्मुख करत आहेत. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेक गरजुंचे प्राण वाचवता येतात एक सामाजिक जबाबदारी म्हणुन आपल्याकडून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत असलेल्या ‌‌संत निरंकारी ‌‌मंडळातर्फे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

रक्तदान करा जीवनदाते व्हा असा नारा देत या सुवर्ण संकल्पात सर्व समाज बांधवांसह व आपल्या मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे असे आवाहन संत निरंकारी मंडळ चोरीवलीचे मुखी गणेश राणे यांनी केले आहे.

Popular posts from this blog