रोहा तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्यावतीने ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन
नावीन्यपुर्ण स्पर्धेची युवती व महिलांमध्ये उत्कंठा
रोहा : रविना मालुसरे
"दिवाळी म्हणजे मांगल्य, दिवाळी म्हणजे पावित्र्य" म्हणूनच दिवाळीत मांगल्याचे प्रतिक असलेली रांगोळी घराबाहेर काढण्याची आपल्याकडे परंपरा आहे. अशा सुंदर रांगोळ्या रेखाटणार्या युवती व महिलांना प्रोत्साहित करणे व त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेस रोहा यांनी तालुकास्तरिय ऑनलाईन रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांच्या सहकार्याने युवती अध्यक्षा कु. रविना मालुसरे स्पर्धेची तयारी करीत आहेत. आजच्या टेक्नोसेव्ही तरुणाईमध्ये Selfi With Rangoli ह्या संकल्पनेवर आधारित अभिनव रांगोळी स्पर्धेबद्दल उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
ही स्पर्धा फक्त रोहा तालुका मर्यादित आहे. स्पर्धेत फक्त महिला व युवतींना सहभागी होता येईल. स्पर्धा दिनांक 5 नोव्हेंबर 2021 व 6 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला दिनांक 4 नोव्हेंबर 2021 पूर्वी 7887402011 ह्या मोबाईल क्रमांकावर आपले नाव-पत्ता व्हाट्सअप करावे लागेल.तरच आपले रजिस्ट्रेशन होईल.स्पर्धेचे ठिकाण आपले स्वतःचे घर हेच असणार आहे.
ऑनलाईन रांगोळी स्पर्धेची कार्यपद्धती
आपले रजिस्ट्रेशन झाल्यावर आपल्याला स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना व रांगोळीखाली लिहिण्याचा कोड पाठविण्यात येईल.स्पर्धकाने रांगोळीचा सेल्फी फोटो (स्पर्धकाचा चेहरा व रांगोळी कोड दिसेल असा) काढावा, तसेच दुसरा फोटो पुर्ण रांगोळी दिसेल असा काढावा. हे दोन्ही फोटो 7887402011 ह्या मोबाइल क्रमांकावर whatsapp करावेत. दि. 6 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्राप्त रांगोळ्यांचा परिक्षणासाठी विचार करण्यात येईल. प्राप्त झालेल्या सर्व रांगोळ्यांचे तज्ज्ञ परिक्षकांद्वारे परिक्षण करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांची नावे प्रसारमाध्यमांवरुन जाहीर करण्यात येतील.पहिल्या पाच विजेत्यांना आकर्षक बक्षिसे माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात येतील.तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
रोहा तालुक्यातील जास्तीत जास्त युवती व महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन रोहा तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने करण्यात येत आहे.