यशवंतखार येथे रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सरपंच सौ. स्वप्नाली संतोष भोईर यांनी संस्थेच्या दातृत्वाचे केले कौतुक
रोहा : रविना मालुसरे
रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्लच्या वतीने यशवंतखार ता. रोहा येथील समाजमंदिरात रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात यशवंतखार परिसरातील अनेक गरीब व गरजू रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.शिबीरात विशेषतः डोळे, दात व जनरल आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यावेळी यशवंतखार ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. स्वप्नाली संतोष भोईर यांनी रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य सुविधा पुरविल्याबद्दल ग्रामस्थ व लाभार्थी नागरिकांच्यावतीने संयोजक व डॉक्टरांचे आभार मानले.
गरीब व गरजू व्यक्तींच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रथमेश बुधे-दंतचिकीत्सक, डॉ. देवेंद्र जाधव-नेत्रचिकित्सक, डॉ. किरण म्हात्रे-जनरल फिजिशियन, डॉ. चैत्राली पवार-जनरल फिजिशियन व डॉ. प्रगती देशमुख-जनरल फिजिशियन हे मान्यवर अधिकारी उपस्थित होते. तर यशवंतखारच्या प्रथम नागरिक सौ. स्वप्नाली संतोष भोईर-सरपंच, श्री. संतोष भोईर-युवा नेते, सौ. अपर्णा शामित दिवकर-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे अध्यक्ष रो. डॉ. कैलास जैन, सेक्रेटरी रो.अजित तेलंगे, खजिनदार रो.विकास जैन, प्रोजेक्ट चेअर रो. डॉ. प्रथमेश बुधे यांनी अथक परिश्रम घेतले.
रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या ह्या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.