क्लॅरियंट कंपनीला लागले परप्रांतीयांचे ग्रहण! 

स्थानिक पुढाऱ्याने काँट्रॅक्ट घेतल्याने भरतीमध्ये होतेय राजकारण 

स्थानिक कामगारांना नोकरीतून कमी करण्याचे राजकीय डावपेच? 

धाटाव-रोहा (किरण मोरे) : धाटाव औद्योगिक परिसरातील क्लॅरियंट कंपनीला सध्या परप्रांतियांचे ग्रहण लागल्याचे दिसत असून येथील एका स्थानिक पुढाऱ्याने या कंपनीत काँट्रॅक्ट घेऊन येथे कामगारांची भरती करताना सुद्धा राजकीय डावपेच सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. 

या कंपनीमध्ये गेली ४० वर्षे स्थानिक कामगार कार्यरत होते. परंतु मागील ३ महिन्यांपूर्वी मधूकर पाटील नावाच्या एका काँट्रॅक्टरने या कंपनीत काँट्रॅक्ट घेण्यास सुरूवात केल्यापासून या कंपनीला परप्रांतियांचे ग्रहण लागायला सुरूवात झाली आहे. या स्थानिक काँट्रॅक्टरला स्थानिक कामगारांचीच 'ॲलर्जी' झाल्याने या काँट्रॅक्टरने कौस्तुभ चिपळूणकर या दुसऱ्या एका काँट्रॅक्टरसोबत मिळून कंपनी व्यवस्थापनाशी संगनमत करून येथे स्थानिकांना डावलून परप्रांतिय कामगारांना कंपनीमध्ये नोकरीत सामावून घेण्याचे कारस्थान केलेले आहे. आत्तापर्यंत सुमारे १५० परप्रांतिय कामगार या कंपनीत भरण्यात आल्याचे उघडकीस आलेले आहे. 

स्थानिक कामगारांना एक महिना ब्रेक देऊन काढून टाकण्याचा कट! 

क्लॅरियंट कंपनी स्थानिक कामगारांसाठी त्रासदायक बनल्याचे उघडकीस येत चालले आहे. येथील स्थानिक कामगारांना एक महिन्याचा ब्रेक देऊन वेगवेगळे निमित्त सांगून कंपनीतून काढून टाकण्याचे कारस्थान कंपनी व्यवस्थापनाचे साईट हेड अभिजीत दोशी व एच आर मॅनेजर श्री. बडगज यांनी केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. 

मराठी माणसावर अन्याय आणि परप्रांतियांचा पुळका!

ही कंपनी स्थानिकांसाठी, की परप्रांतियांसाठी? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे! कारण बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून येथील स्थानिक बेरोजगार तरूणांना नोकरीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. जेव्हा येथे ही कंपनी सुरू झाली तेव्हा स्थानिक तरूणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल या विचाराने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु कंपनीने परप्रांतिय कामगारांची प्राधान्याने भरती करून येथील स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा धुळीला मिळविल्या आहेत. अर्थात, हा तर स्थानिक मराठी माणसावर अन्याय आहे, असेच म्हणावे लागेल. क्लॅरियंट कंपनीच्या या कृत्यामुळे या परिसरात स्थानिकांचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Popular posts from this blog