रोहा तालुक्यात 'खादाड' अभियंता काढतोय बोगस कामांची बिले, बेकायदा पैसे कमावून गोळा केलीय करोडोंची माया!
शासनाचा पैसा भ्रष्टाचाऱ्यांच्या खिशात
धाटाव/रोहा (किरण मोरे) : रोहा तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत भ्रष्टाचार सुरू असून या भ्रष्टाचारामागचा प्रमुख सूत्रधार एक 'खादाड' अभियंता असल्याचे उघडकीस येत चालले आहे. शासनाकडून पगार घेऊन भ्रष्टाचाऱ्यांची दलाली करणाऱ्या या अभियंत्याने करोडो रूपयांची माया गोळा केली आहे. बेकायदा कमाईतून अनेक ठिकाणी प्रॉपर्टी विकत घेती आहे. भ्रष्टाचाराच्या कमाईतून याच्या नेहमीच एका टोळक्यासह दारू-मटणाच्या पार्ट्या चालू असतात. इन्कमटॅक्स विभागामार्फत या अभियंत्याची चौकशी देखील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत झालेली विकासकामे ही इस्टिमेंट प्रमाणे झालेली नाहीत. पण तरीही भ्रष्टाचाऱ्यांशी संगनमत करून एका अभियंत्याने स्वतःचा खिसा भरून या बोगस कामांची बिले काढून भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यास सुरूवात केली आहे. आता तर या अभियंत्याविरूद्ध तक्रार करण्यासाठी काही तक्रारदार पुढे आलेले असल्यामुळे हा पैसेखाऊ, खादाड अभियंता आता चांगलाच कचाट्यात सापडणार आहे यामध्ये शंकाच नाही!