पेणमध्ये एमआयडीसी लादण्याचा प्रशासनाचा डाव! समिता पाटील व प्रहार नेते ॲड. कशिनाथ ठाकूर यांनी घेतली ना. बच्चूभाऊ कडु यांची भेट
पेण (प्रतिनिधी) : सौ. समिता राजेंद्र पाटील श्री बापदेव शेतकरी मंडळाचे अध्यक्ष श्री सुनिल कोठेकर यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण येथे याचिका (क्र. १२२/२०१५) दाखल केली आहे. यामध्ये जमिन, हवा, जल प्रदुषण तथा कांदळवन कत्तल, नैसर्गिक नाले बुजवून शासकिय व सी.आर.झेड. जमिनी हडप केल्याबाबत व इतर अनेक गंभीर मुद्द्यांवर न्याय मागितला आहे.
जेएसडब्ल्यू कंपनीने दि.२२ फेब्रुवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने No. Di/ Lad/ Permission/ 122 (2012/2013), Permission in Purchase Agriculture Land Under the Mumbai Tenancy and Agriculture Land (BTAL) Act 1948 अन्वये जेएसडब्ल्यू कंपनीस खारमाचेला, खारचिर्बी, खारघाट व खारजांभेला येथे to extent of 302 649 He to establish Coke Oven (2.5 MTPA) Blast furnance (4.5 MTPA) Sinter Plant (7.0MTPA) Steel Melt Shop (4.0MTPA). Cement Plant and Slag Processing Unit (2.7 MTPA) and MSDS (Main Step Down Station) या करिता परवानगी दिलेली आहे. या BTAL Act च्या परवानगी मिळण्याचा अर्थ असा की, त्या गावांमध्ये दि. २२ फेब्रुवारी २०१३ नंतर इतर कोणत्याही प्रकल्पा करिता जमीन अधिग्रहणाची परवानगी दिली जाणार नाही. त्याच प्रमाणे महाराष्ट्र शासन उद्योग संचलनालयाने २२ मार्च २०१३ रोजी क्र. उस / साप्रोयो २००७ / मु. शु. प्र. प. ४९२ / जे. एस. डब्ल्यु. इस्पात स्टील शासनाने निर्गमित केलेले देकारपत्र क्र. एचपीसी २०१३/ सीआर २१/ उद्योग ८ दिनांक ११.०२.२०१३ अन्वये विशाल प्रकल्प म्हणून मान्यता दिली आहे. सदर घटक मुंबई मुद्रांक शुल्क अधिनियम १९५८ अंतर्गत शासन अधिनियम क्र. मुद्रांक २००७/प्र.क्र. १९६ (२)/ म १ दिनांक १२.०६.२००७ व व्यास मुदतवाढ अधिसुचना - निक उप विधामीण अधिकारी कार्यालयदिनांक ०९.०५.२०११, १६.०७.२०११, ०१.१०.२०११, २६.१२.२०११. ०७.०३.२०११ व १७.०५.२०१२ प्रमाणे "विशाल प्रकल्प घटक म्हणून प्रमाणित करण्यात येत आहे. या परवानग्या मिळवल्या आहेत. तथा खारमाचेला येथे कॅप्टीव जेटी प्रलंबित आहे. परंतु समिता पाटील व सुनिल कोठेकर यांची राष्ट्रीय हरित न्यायालय व मुंबई हायकोर्ट येथील याचीका व श्री बापदेव शेतकरी मंडळ व इतर शेतकऱ्यांचा जमिन विकण्यास असणारा तिव्र विरोध या मुळे जे.एस.डब्ल्यू. कंपनीस प्रकल्प वाढ करणे शक्य नसल्याने कंपनी ने प्रशासन व स्थानिक राजकिय नेते यांच्या मदतीने एमआयडीसी लादून आपलच प्रकल्प रेटण्याचा डाव आखला आहे असा समिता पाटील यांचा दावा आहे. तरी सदर बाबतीत न्यायमिळावा याकरिता सौ. समिता पाटील व प्रहार पक्षाचे नेते ॲड. काशिनाथ ठाकुर यांनी खरे शेतकरी नेते ना. बच्चुभाऊ कडु यांची भेट घेऊन प्रकरणाचे गांभिर्य त्यांना सांगितले प्रदुषणाचे व्हिडीओ दाखवले. सदर प्रकाराची ना. बच्चुभाऊ कडु यांनी गंभीर दखल घेतली असुन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकत्या सौ. समिता पाटील प्रहार संघटनेचे नेते ॲड. काशिनाथ ठाकुर ,प्रहार रोहा तालुका अध्यक्ष निकेश पोकळे, दिनेश कातकरी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील व इतर अनेक प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.