धाटाव एमआयडीसी परिसरात वाहनचालकांची लूटमार करणारी १५ जणांची टोळी सक्रीय!
धाटाव/रोहा (किरण मोरे) : धाटाव एमआयडीसी परिसरात वाहनचालकांची लूटमार करणारी १५ जणांची टोळी सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली असून येथील कंपन्यांमध्ये येणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धाटाव एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये ट्रक, टेम्पो यांसारख्या मालवाहतूक करणाऱ्या अनेक गाड्या ये-जा करीत असतात. परंतु या वाहनचालकांकडून बेकायदेशीरपणे जबरदस्तीने पैसे मागून त्यांना लूबाडण्यासाठी १५ जणांची टोळी पुढे आलीय. एका संघटनेचे नाव सांगून ही लोकं वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. काही वाहनचालक या टोळीबद्दल तक्रार करण्यासाठी पुढे येणार असल्याने या १५ जणांवर खंडणीची तक्रार दाखल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.