ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चा संघटनेच्या रायगड जिल्हा युवा अध्यक्ष पदावर अजेश नाडकर यांची नियुक्ती
माणगांव (प्रतिनिधी) : ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चा संघटनेच्या रायगड जिल्हा युवा अध्यक्ष पदावर अजेश नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब सानप व संस्थापक महासचिव श्री. बालाजी शिंदे, उपाध्यक्ष राजू साळुंखे, अनिल पवार, निलेश म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरिय कार्यकारिणीची बैठक मराठी पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झाली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्ष पदावर माणगांव येथील अजेश नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदावर सक्रीयपणे कार्यरत राहून वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार अशी ग्वाही अजेश नाडकर यांनी दिली. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.