विकासात्मक धोरणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जनतेचा वाढता कल - खा. सुनिल तटकरे 

शिवसेना, भाजप, शेकाप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

तळा (संजय रिकामे) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि रायगडचे कार्यसम्राट खा.सुनील तटकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत रायगड जिल्हा परिषद शिवतीर्थ आणि तालुक्यांतील पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी व्युहरचना आखली असुन प्रचाराची सुरूवात आपल्या श्रीवर्धन मतदार संघातील बालेकिल्ला असलेल्या तळा तालुक्यातुन केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून  दि. 24/10/21 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा गो. म. वेदक विद्या मंदिर येथे घेण्यात आला या मेळाव्यामध्ये  शिवसेना, भाजप, शेकाप पक्षातील अनेक पदाधिकारी यांचा जाहीर प्रवेश घेत तळा तालुक्यातील आपली पकड अजून मजबूत केली आहे.या मेळाव्यासाठी तालुका अध्यक्ष नाना भौड, राजीप महिला व बालकल्याण सभापती सौ. गीता जाधव, पंचायत समिती सभापती सौ. अक्षरा कदम उपसभापती गणेश वाघमारे, राजिप सदस्य बबन चाचले, मंगेश देशमुख, हिराचंद तांबे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे, नगरसेवक चंद्रकांत रोडे, चंद्रकांत भोरावकर, मंगेश शिगवण, ॲड. उत्तम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

तळा तालुक्याच्या निर्मीतीनंतर या तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची मजबुत पकड आहे केवळ नगरपंचायीमध्ये या पक्षाला अपयश आले होतेे. विकासकामांचा झंझावात खा. तटकरे यांनी टिकवुन ठेवल्यामुळे विरोधकांना येथे संधीच नसल्याचे बोलले जात आहे तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावीत होउन तालुक्यातील स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष भास्कर कारे यांच्यासह शिवसेना, भाजप, शेकाप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला ग्रामीण भागातील शिवसेना नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश घेण्याची जणुकाही स्पर्धाच सुरु होती.आगामी राजिप आणि पंचायत समिती निवडणुकीच्या  पाशर्वभूमीवर प्रत्येक आठवड्याला विकासकामांची भुमीपूजन आणि ऊदघाटन त्याचबरोबर पक्षप्रवेश मेळावे राष्ट्रवादीकडुन होत आहेत त्यामुुळेेे विरोधकांनी त्याचा धसका घेतला आहे. 

यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन करताना सर्वधर्म समभाव, बंधुत्व जपत शहराबरोबरच गाववाड्यांचा विकास गेली तीस ते पस्तीस वर्षे अविरत करत आहे. काही जुने सहकारी दुसऱ्या विचारधारेशी जोडले गेेले होते परंतु ते आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आले आहेत त्यांचे मी स्वागत करतो, भास्कर कारे यांनी 2014 सालि युवकांच्या संघटनेची स्थापना केली सामाजिक  स्तरावर चांगले काम केले परंतु त्याला राजकारणाची जोड असणे गरजेचे आहे कारे आणि त्यांचे सहकारी यांनी आज घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगून संघटनेला बळकटी देण्याचे काम सुनील तटकरे करेल असे यावेळी आवर्जून सांगितले. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जपत सत्ता असो वा नसो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यमातुन जनतेचा सर्वांगीण विकास करीत आहोत आणि भविष्यात करीत राहणार असे सांगताना दिवाळी पूर्वीच तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ने फटाके फोडले असल्याचे त्यांनी सांगितले. खा. सुनिल तटकरे यांनी पुढे बोलताना 1992 सालि  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून  क्रितेक वर्ष मतदार संघाचा खुंटलेला विकास करण्याचे भाग्य लाभले आहे. जनतेनी मला आपला नेता म्हणून स्विकारले त्या जनतेचे प्रश्न सोडविणे मी माझे कर्तव्य समजतो धर्माच्या जातीपातीच्या नावावर राजकारण करून कधीही मते मागितली नाही आणि मागणार ही नाही असे सांगताना माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांमुळेच आज कित्येक महिलांना राजकारणात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळत आहे असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी शाल घालून स्वागत केले व प्रत्येकाला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जवाबदारी दिली जाईल असे यावेळी सांगितले. या पक्ष मेळाव्यात स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष भास्कर कारे व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख अशोक राणे, बोरघर हवेली सरपंच सौ. कदम, संदीप मुंढे, आत्माराम शेलार, यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Popular posts from this blog