क्लॅरियंट कंपनीत परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती, स्थानिक बेरोजगारांकडे दुर्लक्ष! 

ही कंपनी स्थानिकांसाठी, की परप्रांतियांसाठी? 

धाटाव/रोहा (किरण मोरे) : धाटाव औद्योगिक परिसरातील क्लॅरियंट कंपनीत परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरणा केला जात असून स्थानिक कामगारांना नोकरीतून कमी करण्याचे कट-कारस्थान येथील कंपनी व्यवस्थापनाने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. 

बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून येथील स्थानिक बेरोजगार तरूणांना नोकरीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. जेव्हा येथे ही कंपनी सुरू झाली तेव्हा स्थानिक तरूणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल या विचाराने या परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतु कंपनीने परप्रांतिय कामगारांची प्राधान्याने भरती करून येथील स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा धुळीला मिळविल्या आहेत. दरम्यान, ही कंपनी स्थानिकांसाठी आहे की परप्रांतीयांसाठी? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. परंतु क्लॅरियंट कंपनीला याबाबत काहीच घेणे-देणे नाही असे दिसत आहे. स्थानिक कामगारांविरूद्ध कट-कारस्थान करून त्यांना कंपनीतून काढण्याचे या कंपनीचे कारस्थान असून वेगवेगळे निमित्त दाखवून हळूहळू कंपनीतून स्थानिक कामगारांची कपात करण्यास सुरूवात केलेली आहे. तसेच सुमारे १५० परप्रांतिय कामगारांची या कंपनीत भरती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्लॅरियंट कंपनीच्या या कृत्यामुळे या परिसरात स्थानिकांचा उद्रेक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Popular posts from this blog