ग्रामसेवक दत्तात्रेय सावंत यांना ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्याची ॲलर्जी? 

त्यापेक्षा यांनी कायम घरीच का बसू नये? नागरिकांचा सवाल! 

धाटाव/रोहा (किरण मोरे) : जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसे आहेत. त्यामध्ये प्रत्येकाला काही-ना-काही ॲलर्जी असते! काहींना तिखट खाण्याची ॲलर्जी, काहींना गोड खाण्याची ॲलर्जी, तर काहींना वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असते. परंतु रोठ खुर्द ग्रामपंचायतीते ॲडीशनल (अतिरीक्त) ग्रामसेवक दत्तात्रेय सावंत यांना तर ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्याचीच ॲलर्जी असल्याने हा कोणत्या टाईपचा प्राणी आहे? यांना निलंबीत का करू नये? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिला आहे. 

रोहा तालुक्यातील रोठ खूर्द ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्याने मागील दोन वर्षांपासून तळाघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दत्तात्रेय सावंत यांच्याकडे रोठ खूर्द ग्रामपंचायतीचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. परंतु यांची वागणूक देखील थोडीशी विचीत्र असल्याचे दिसून आलेले आहे. या परिसरातील एखाद्या नागरिकाची तक्रार असल्यास त्याचा पुन्हा फोन कॉल येऊ नये म्हणून त्याचा नंबर ब्लॉक करतात! तसेच हे ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्याचा कंटाळा येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ग्रामसेवक यांच्या नावे एखादा पत्रव्यवहार असेल तर येथील पोस्टमनला वारंवार फेऱ्या मारून देखील ते तिथे उपस्थित असल्याचे दिसत नाहीत. यांना जर कार्यालयात बसून प्रामाणिकपणे ड्युटी करण्याची ॲलर्जी असेल तर यांनी कायम घरीच का बसू नये? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Popular posts from this blog