शेडसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत शाळेच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार!
शेकाप कार्यकर्ते देवचंद्र म्हात्रे यांच्याकडून कारवाईची मागणी
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून या परिसरातील शेकाप कार्यकर्ते देवचंद्र म्हात्रे यांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
या शाळेच्य बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्ये लोखंडी कैच्या वापरण्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. परंतु येथील संबंधित ठेकेदाराने लाकडी कैच्या वापरून कमी खर्चात काम भागवले आणि शासनाचा निधी हडप करण्याचे कारस्थान केले. अर्थात, येथे भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आलेले आहे.
रोहा पंचायत समितीतून चुकीच्या कामाचे बिल निघणार का?
रोहा पंचायत समितीमध्ये एक कनिष्ठ अभियंता हा बोगस बिले काढण्यात पटाईत असून हा अभियंता दर महिन्याला शासनाचा पगार घेऊन भ्रष्टाचाऱ्यांची दलाली करत असल्याचे उघडकीस आलेले आहे.
परिणामी शेडसई शाळेच्या या बोगस कामाचे कामाचे बिल काढल्यास रोहा पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई होणार हे निश्चितच आहे!