नागोठणे येथील महिला पत्रकार सौ. श्वेता राज वैशंपायन यांचा सन्मान
नागोठणे (प्रतिनिधी) : नागोठणे येथील महिला पत्रकार म्हणून दैनिक रायगड टाईम्स च्या श्वेता वैशंपायन यांचा अष्टविनायक बिगर शेती सहकारी पतसंस्थे मार्फत विशेष सत्कार संस्थेचे चेअरमन श्री. विलास चौलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागोठणेमधील तमाम महिला वर्ग व प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी श्वेता वैशंपायन आपल्या मनोगत पर भाषणात म्हणाल्या की, रत्नागिरी टाईम्स चे संपादक श्री. उल्हास घोसाळकर यांनी मला आपल्या वृत्तपत्रात काम करण्याची संधी दिली व त्यामुळेच मी स्वतःला सिद्ध करू शकले. आज श्री. चौलकर यांनी फक्त माझाच सन्मान केला नसुन संपुर्ण नागोठणे मधील महिलांचा सन्मान केला आहे. आपण करत असलेल्या सन्मानामुळेच आम्हा महिलांना सामाजिक कार्यात काम करण्याची आवड निर्माण होऊन प्रेरणा मिळते व आमचे मनोधैर्य वाढते. आपण माझा सन्मान केलात त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करते असे त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी त्यांचे पती श्री. राज वैशंपायन व नागोठणे मधील ज्येष्ठ पत्रकार श्री. याकुब सय्यद देखील सोबत उपस्थित होते.