१८ ऑक्टोबर रोजी जेएसडब्ल्यू विरोधात लोकआंदोलन छेडणार!
आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा पत्रकार परिषदेत इशारा
पेण (प्रतिनिधी) : स्थानिक तरुणांना व भूमिपुत्रांना रोजगार न देता परराज्यातील तीस ते चाळीस हजार कामगारांची भरती करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासनाविरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय लोक आंदोलन व मोर्चाचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. सदरच्या आंदोलनाला सकाळी ३ वाजता सुरुवात होणार असून या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्तानी व तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच स्थानिकांना नोकऱ्या, कांदळवनाची केलेली बेसुमार कत्तल, शासकीय जमिनीवर बेकायदेशीर केलेले अतिक्रमण तसेच परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले पारंपारिक स्रोत बंद केल्या याविरोधात सदरचे आंदोलन पुकारण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला आमदार महेंद्र दळवी, माजी जिल्हा प्रमुख विष्णूभाई पाटील, शिवसेनेचे सल्लागार किशोर जैन, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.