द्रोणाचार्य करियर अकॅडमी तर्फे शिहू येथे मार्गदर्शन शिबीर
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : द्रोणाचार्य करियर अकॅडमी तर्फे पोलिस भरती तसेच इतर भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर बहिरेश्वर मंदिर शिहू येथे प्रतिक साळुंखे (नॅशनल लेवल लॉन्ग जम्प सिल्व्हर मेडलीस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रतिक साळुंखे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही ते मी त्यांना योग्य पद्धतीने देऊन तीन महिन्यात विद्यार्थ्यांच्या पुर्ण मैदानी चाचणीची तयारी करून घेण्याचे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
या मार्गदर्शन शिबीराला उपस्थित परमार्थ ग्रुप चे शुभम मोकल, कृतेश खाडे, राजेश गदमले, शिहू विभागातील बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.