नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा
रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांची मागणी
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या प्रयत्नाने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आली.
त्यावेळी किशोर जैन म्हणाले की, तालुक्याला आर. एच. चा दर्जा देतात हा शासकीय निर्णय झाला. परंतु जिथे अशा गोष्टीची आवश्यकता आहे तिथे आपल्या नागोठणेला उपजिल्हा रुग्णालय (आर.एच.) चा दर्जा द्या असे मी नेहमी सांगत असतो आणि ऍक्सिडेंट साठी ट्रॉमा केअर सेंटर मिळावे अशी मागणी मी करत असतो. म्हणून आपल्या नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला तर येथील व्यवस्था अजून चांगली होऊ शकते. त्यासाठी आपण नागोठणे तालुका व्हावा याचाही प्रस्ताव टाकलेला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय होणं, नगरपालिका होणं हे आपोआप सोपं होईल. यादृष्टीनेही आपले प्रयत्न सुरु आहेत असे ते यावेळी म्हणाले.
त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित नागोठणे ग्रा.पं. सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, बिलाल कुरेशी, वरवठणे ग्रा.पं. सरपंच ऋतुजा म्हात्रे, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी अभय ससाणे, वैद्यकीय अधिकारी, डॉ. आदित्य शिरसाठ, डॉ. श्रुती मोरे, आरोग्य सहाय्यक वाय. एम. कर्जेकर, आर. डी. हंबीर, आरोग्य सहाय्यिका एन. एन. म्हात्रे, आरोग्य सेवक तांबोळी, जगदीश मोकल, औषध निर्मिती अधिकारी देवानंद इंगळे, युवासेना रायगड जिल्हा अधिकारी सुधीर ढाणे, शिवसेना पेण तालुका महिला संघटिका दर्शना जवके, मनोहर सुटे, गणपत म्हात्रे, प्रकाश कांबळे, ज्ञानेश्वर साळुंखे तसेच नागोठणे शहरातील व विभागातील सर्व शिवसैनिक, युवासैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.