रायगड जिल्ह्यातील तळा येथे मटका, जुगार व गुटखा विक्री तेजीत, पोलीसांचे दुर्लक्ष!
रायगड (समीर बामुगडे ) : तळा तालुक्यात एसटी बँक ऑफ इंडियाच्या बाजूला, पाणपोईच्या पाठीमागे आणि चणेवाल्याच्या शेजारी छुपा मटका सुरु असून पोलीसांनी तातडीने या अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. तसेच तळा येथे तंबाखूजन्य गुटख्याची पुडीतून सर्रासपणे विक्री केली जात असून अन्न व औषध प्रशासन, पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
तळा तालुक्यात तबांखूजन्य गुटखा, विमल अशा प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाची राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर कागदाची पुडी बांधून विक्री होत आहे. तसेच छुप्या मार्गाने रात्रीच्या वेळी आणली जात आहे. लॉकडाऊन काळात शासनाचे कडक निर्बंध असून तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्याची बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणावर गुटखा आणला जात होता व अशा पद्धतीने विक्री केली जात असताना मात्र याकडे पोलीस प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करून विक्रेत्याला मोकळीक दिली होती असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामागे संबधीत अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन याचा देखील वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून छुप्या मार्गाने मिळत असल्याने खरेदी करीत आहेत. तसेच मटका जुगार, हातभट्टी मद्य जोरात धंदा राजरोसपणे चालू आहे. याकडे पोलीसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कारेयकर्ते नजीर पठाण यांनी केली आहे.