तळा शहरात शिवसेनेकडुन विकासकामांचा धडाका!
तळा (संजय रिकामे) : तळा शहरात शिवसेनेकडुन विकासकामांचा धडाका सुरु असुन शहरातील अनेक समस्या सोडवून रहिवाश्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास त्यांना यश आले आहे. गेली दोन वर्ष कोरानामुळे विकासकामे करता आली नाही परंतु आता विकास कार्य बाधीत होणार नाहीत याची दक्षता घेत नगरपंचायत निवडणुक पुर्वी समाज कार्याचा ध्यास घेवुन शिवसेना पक्षाकडुन विकास कामांचा धडाका सध्या तळा शहरात सुरु आहे.
दिलीप दलाल ते मोहन लिमकर (कासार अळी बाजारपेठ) यांंच्या घरापर्यंत गटार बांंधणे, कासार समाज स्वामी समर्थ सभागृह बांधणे, मधली अळी गणपती मंदीर चंडिका काॅप्लेक्स परिसर गटार बांधणे व रस्ता तयार करणे, वरचा मोहल्ला उर्दू हायस्कूल तळा संरक्षित भिंत बांधणे, वडाची वाडी पारधी आळी मोहीते आळी रस्ता करणे सुतार आळी प्रकाश झापकर ते दिलीप वडके यांच्याा घरापर्यंत रस्ता करणे सुतार आळी येथील सामाजिक सभागृह बांधणे, नगरपंचायत ते वरचा मोहल्ला पासुन म्हसोबा आळी होळी पर्यंत नगरपंचायत ते दिलीप दलाल यांच्याकडे घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, मधली अळी गुरव समाज स्माशान भुमी शेड चोथरा संरक्षण भिंत बांधणे आनंदवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे रोहीदास वाडी अंतर्गत रस्ता करणे नाभिक समाज समाजिक सभागृह बांधणे जोगवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे राणेची वाडी गोळे अळी येथे अंतर्गत रस्ता बांधणे, जोगवाडी स्मशानशेड दुरुस्ती व सुशोभिकरण जोगवाडी येथील श्री.चंडिकादेवी सभामंडप शेड बांधणे शहरातील जवळ जवळ प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी विकासकामे प्रगतीपथावर आहेत काही सुरु आहेत तर काही पूर्णत्वास आलेली आहेत.
शहरात कोट्यावधी रूपयांची विकासकामे मंजुर करून तीचे केवळ भुमीपुजन न करता कामे पुर्ण करण्याचा जिल्ह्यात नवा किर्तिमान तळा नगरपंचायतीच्या माध्यमातून केला जात असल्याचा दावा शिवसेना पक्षाकडुन केला जात आहे.रोहिदास आळी येथे अंतर्गत रस्ता बांधणे या कामाचे भुमीपुजन शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री. लिलाधर खातु, नगरसेविका वासंती तळकर यांच्या शुभास्ते पार पडले यावेळी शहर प्रमुख राकेश वडके, नगरसेविका स्नेहल तळकर, तळेगाव ग्रामपंचायत उपसरपंच संदीप दळवी, गुरुदास तळकर, शौकत भाई कुरूक्कर, लक्ष्मण निगुडकर, सागर तळकर, अनिल तळकर, अब्दुल कुरूक्कर, प्रभाकर कोलवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.या कामाचे पहाटे भुमीपुजन करुन संध्याकाळ पर्यंत हे काम पुर्ण करण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी शिवसेना आमदारांकडून विकासकामांचे भूमिपूजन तळा शहरात करण्यात आले होते, व त्याचे भले मोठे बॅनर्स शिवसेना पक्षाकडुन तळा शहरात लावण्यात आले त्यावेळी विरोधकांनी ही कामे केवळ कागदोपत्री आहेत ती पूर्ण होणार नाहीत अशी टिका केली होती परंतु शिवसेना दिलेला शब्द पाळते केवळ भूमिपूजन करुन थांबत नाही तर कामे पुर्ण करते तळा शहराचा विकास हाच शिवसेनेचा ध्यास असुुुन केलेल्या कामांचा उदघाटन सोहळा काही दिवसात पार पडेल.
- श्री. लिलाधर खातु (जेष्ठ शिवसैनिक)