ऐनघर ग्रामपंचायतीतर्फे पत्रकार श्री. राज वैशंपायन यांचा सन्मान
नागोठणे (वार्ताहर) : महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माझा रायगड लाईव्ह चे संपादक श्री. राज वैशंपायन यांचा नुकताच ऐनघर ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला श्री. राज वैशंपायन यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करत पत्रकारिता क्षेत्रातील मनाची अशी मुंबई विद्यापीठाची बी.एम.एम. ही पदवी संपादन केल्यामुळे त्यांचा रा.जि.प सदस्य किशोरभाई जैन व ग्रामस्थ यांच्या हस्ते विशेष सत्कर करण्यात आला. राज वैशंपायन यांनी अल्पवधीत आपल्या पत्रकारितेचा ठसा नागोठणे विभागात चांगल्या प्रकारे उमटवला आहे. आपल्या धारदार लेखणीतून त्यांनी कित्येकदा अन्यायाला वाचा फोडत विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. आजवर त्यांनी मोठमोठया दैनिकांमध्ये वृत्तलेखनाचे उत्कृष्ठ कार्य केले आहे. ते माझा रायगड लाईव्ह या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून विविध प्रश्नाला वाचा फोडत असून सर्वसामान्य जनतेसाठी हक्काने भांडताना दिसत आहेत. यावेळी रायगड जिल्हा युवा सेना अध्यक्ष सुधीर ढाणे,भाजपा युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग, रोहा पंचायत समिती सदस्य संजय भोसले, सरपंच कलावती कोकळे, माजी उपसरपंच मनोहर सुटे, सदस्य विनोद निरगुडा, राजेंद्र कोकळे, किशोर नावळे, प्रकाश डोबळे, भगवान शिद, आदी उपस्थित होते.