रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झंझावात सुरूच!
कार्यकारिणी सभेत निडी तर्फे अष्टमी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
रोहा (रविना मालुसरे) : खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी सभा रोहा तालुक्यातील किल्ला येथील ओम नमः शिवाय मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी माजी सभापती राजेश्री राजेंद्र पोकळे व माजी सरपंच राजेश्री राजेंद्र पोकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निडी तर्फे अष्टमी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश केला.
निडी तर्फे अष्टमी उपसरपंच उत्तम सिताराम नाईक, सदस्य अक्षरा अक्षद डोलकर, नयनीता नवनीत डोलकर, नवनीत खेळू डोलकर, शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत कारभारी, ज्येष्ठ नेते दत्ताराम गोपीनाथ चोरगे, काशिनाथ गोपीनाथ चोरगे, रत्नदीप हरी चेऊलकर, गोरख विश्वनाथ नाईक, तुळशीराम कारभारी, ज्ञानेश्वर कारभारी, रत्नदीप चौलकर, स्वागत चौलकर, गौरव नाईक, सुरज नाईक, रुपेश चोरगे, राज कारभारी, अविराज कारभारी, लाभेश डोलकर, जगदीश पाटील, विराज चोरगे, प्रदीप कारभारी, कल्पेश नाईक, प्रवीर डोलकर, कल्पेश पाटील, प्रेक्षित कारभारी, सचिन कारभारी, उपेश कारभारी, चैताली कारभारी, संजीवनी कारभारी, रेखा कारभारी, मिताली कारभारी, सृष्टी कारभारी, सानिया कारभारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि खारापटी गावातील सर्व युवा सुरक्षा रक्षक यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहिर प्रवेश केला.
याप्रसंगी राजेंद्र मारूती पोकळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहा तालुका उपाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली. दरम्यान, नवनियुक्त पदाधिकारी आणि पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षातर्फे स्वागत करण्यात आले.