नागोठणे राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष पदी संतोष कोळी यांची निवड
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कोळी यांची नागोठणे राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना संतोष कोळी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणांचे पालन करून संघटना वाढीकरिता अविरत प्रयत्न करताना मोठ्यांचे आशीर्वाद, साहेबांचे मार्गदर्शन व लहानांचे सहकार्य घेत पुढील वाटचाल करणार असल्याचे म्हणाले.
संतोष कोळी यांची नागोठणे विभाग अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सर्वच स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.