अष्टमी येथील कब्रस्थान परिसरात आढळले एक दिवसाचे बेवारस अर्भक
रोहा (समीर बामुगडे) : रोहा शहरात अष्टमी येथील कब्रस्थान परीसरात एक दिवसाचे बेवारस बाळ मिळाले आहे. नवजात अर्भक बेवारस स्थितीत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. निर्दयी मातेने आपल्या बाळाला झाडीझुडपात फेकून दिल्याची दुर्दैवी घटना रोहा अष्टमी येथे घडली आहे.
कब्रस्थानजवळ झाडाझुडपात एक दिवसाचे हे नवजात अर्भक कोणी टाकले याचा शोध पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिस घेत आहेत.
मंगळवार दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास अष्टमी खालचा मोहल्ला येथील तरुण ताबीश इस्माईल लद्दू हे कब्रस्थांन परिसरात आपले गायबैल चरून झाल्यावर आणण्यासाठी गेला असता एका अर्भकाला कावळे टोचमारत असल्याचे निर्दशनास आले. त्याने त्या अर्भकाला झाडीझुडपातून काढण्याचा प्रयत्न केला, झाडांच्या पानांच्यावेळी त्याच्या गळ्याला गुरफटल्या होत्या. ताबीशने त्याला त्यातून बाहेर काढले. मित्र नातेवाईकांच्या सहकार्याने पोलिस स्टेशन मार्फत सरकारी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अष्टमी येथे अर्भकाला फेकण्यातआले ते कब्रस्तान परीसर आहे. त्या ठिकाणी झाडीझुडपेआणि अनेक उनाड कुत्रे, पशुपक्षी आहेत ,ताबीश हा तरुण जर वेळेत तिथे गेला नसता तर अनर्थ घडला असता.
अष्टमी परीसरात पुरुष जातीचा एक दिवसाचा नवजात अर्भक मिळाल्याची चर्चा या परीसरात वाऱ्यसारखी पसरली त्या अर्भकाला पाहण्यासाठी गर्दी केली. एक दिवसाचे हे अर्भक असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. निर्दयी मातापित्याने नवजात बालकाला मरण्यासाठी असे का फेकून दिले. माता तू कशी झालीस वैरीण अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक संजय पाटील याचा सखोल तपास करत आहेत. बालकाला अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.