सामाजिक उपक्रमाची दखल घेत आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते चंद्रकांत अडसुळे यांचा सत्कार

नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : सम्यक कला, क्रिडा, शैक्षणिक व सामाजिक संस्था बेणसे, ता. पेण, जि.रायगड रजि. महाराष्ट्र  संस्थेकडून केलेल्या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अडसुळे यांना शुभसंदेश पत्र देऊन  अलिबाग मुरूड मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कडून गौरविण्यात आले.

याप्रसंगी बेणसे, झोतिरपाडा शिवसेना विभागीय नेते भाई अशोक भोय, कामगार नेते भाई अरूण कुथे, आदिनाथ अडसुळे, अमोल भोय आदि मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचा वतीने आमदार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त केले. बेणसे झोतिरपाडा विविध समस्यांवर अशोक भोय यांनी प्रश्न उपस्थित केले. यावर आमदार साहेबांनी लवकरच मिटींग लावून समस्याचे निवारण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Popular posts from this blog