आमदार महेंद्रशेठ दळवी आणि जि. प. सदस्या मानसीताई दळवी यांंच्या विशेष प्रयत्नांनी ६३२ लाभार्थ्यांनी घेतला लसीकरणाचा लाभ!
अलिबाग (प्रतिनिधी) : अलिबाग तालूक्यातील रामराज येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये मोफत कोवीड-१९ लसीकरण शिबीर राबविण्यात आले. यावेळी जि. प. सदस्या सौ. मानसीताई दळवी यांंच्या हस्ते सदर लसीकरण शिबीराचा शूभारंभ करण्यात आला.
यावेळी बाळाशेठ तेलगे, शिवसेना उपतालुका प्रमूख आप्पा पालकर, विभाग प्रमूख पृथ्वीराज पाटील, कृष्णाभाई म्हात्रे, शिवसेना नेते, उपविभाग प्रमूख महेश शिंदे, जनार्दन भगत, मंगेश म्हात्रे, जगदिश गायकर, जीवन म्हात्रे, गिरीष शेळके, संतोष म्हात्रे, रसिक पाटील, गजानन पाटील, संदीप चाचड, अनंत पुनकर, भरत पालकर, विशाल पाटील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
विषेश म्हणजे तालुक्यामध्ये प्रथमच एका दिवसामध्ये ६३२ लसीकरण करण्यात आले. यावेळी विभागातील अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला. आमदार महेंद्रशेठ दळवी व जि. प. सदस्या सौ. मानसीताई दळवी, तसेच, जिल्हा परिषद व जिल्हा परीषद आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रामराज कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन व नियमांचे पालन करून हा लसीकरणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल रामराज विभाग शिवसेनेच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.