एस.एस.ओ.एस.पी कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : भा.ए.सो. च्या शेठ ओटरमल शेषमल परमार महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांना नन्फो एझ्विम प्रा.लि. रांजणगांव एमआयडी, पुणे इथे प्लेसमेंटला जॉब मिळाला आहे. यामध्ये कॉम्प्युटर व इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही १००% सिलेक्शन झाल्यामुळे कॉलेजचे नांव उंचावले आहे. एस.एस.ओ.पी कॉलेज हे नेहमीच विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन त्यांच्या यशासाठी झटत असते. प्लेसमेंटला सिलेक्शन झालेल्या वीस विद्यार्थ्यांची नांवे आश्रय दिनेश पाटील, शुभम दिनेश पाटील, साहील संतोष ठमके, विपुल गोरख कांबळे, स्नेहा सचिन नाथ, कोमल अनिल पिंगळे, हरेश रामा कोकरे, ओंकार सुधीर भोसले, रोहीत रामचंद्र नाईक, हर्षल शहाजी पाटील, निखिल लक्ष्मीकांत पाटील, निलेश चंद्रकांत पिंगळा, अजय ललीत शिद, प्रिती संतोष म्हात्रे, स्वपना चंद्रकांत वारगुडे, दिपक माया गोरे, दिव्या राम थळे, जान्हवी वसंत कदम, शुभम प्रमोद चोगले आणि तेजस महाले.
त्यांना कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर निशा जामकर व ट्रेनिंग प्लेसमेंट असिस्टंट ओंकार धरणे यांचे सखोल मार्गदर्शन मिळाले त्यामुळे त्यांना हे यश मिळू शकले.
कॉलेजच्या या यशाबद्दल संस्थापक-अध्यक्ष किशोर जैन, कार्तिक जैन, संस्थेचे प्राचार्य प्रविण भारती यांनी त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.