माणगांवमध्ये शेकाप कडून आरती संग्रह पुस्तकांचे प्रकाशन

शेकाप युवा नेते निलेश थोरे यांचा स्तुत्य उपक्रम

माजी आमदार पंडितशेठ पाटीलांकडून कौतुकाची थाप!

माणगांव (प्रमोद जाधव) : कोकणात महत्वाचा व अतिविशेष व विद्येचे उगमस्थान असणाऱ्या आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन म्हणजे कोकणी चाकरमान्यांचा व कोकणी माणसाचा आवडता उत्सव म्हणून या सणाकडे पाहिला जात आहे. याच विषयाचे भान ठेवून शेकाप पक्ष जनमानसात डोळ्यासमोर रहावा व विसरलेल्या आरत्या डोळ्यासमोर याव्यात आणि कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती अशा विषयाला हात घालून निलेश थोरे यांनी आरती संग्रहाच्या पुस्तकाची रचना केली आहे. अशा पुस्तकाचे प्रकाशन आज ५ सप्टेंबर रोजी माणगांव मध्ये युवा नेते निलेश थोरे यांच्या कार्यालयात शेकापचे ज्येष्ठ नेते व जे. बी. सावंत एज्युकेश सोसायटीचे चेअरमन नानासाहेब सावंत यांच्या हस्ते व शेकाप ज्येष्ठ व युवा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले व याच वेळी माणगांव शहरातील वाकडाई नगर येथील विनय कदम या युवकाने जिल्हास्तरीय ऊशू (किकबॉक्सिंग) स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्या बद्दल कार्यक्रमास उपस्थित सर्व शेकाप मान्यवरांकडून विनय कदम याचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी या कार्यक्रमास माणगाव तालुक्यातुन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे, सुभाष सोसायटी खरवली चेअरमन अण्णासाहेब आंबूर्ले, माणगांव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक राजेश कासारे, सुरव माजी सरपंच सखाराम जाधव, रमेश बक्कम, टी. एम .सी. कॉलेजचे उपप्राचार्य एच व्ही जोशी, सुभाष टेम्बे, रामदास पुराणिक उपस्थित होते.

माणगांव तालुक्यात शेकाप कडून प्रकाशन झालेल्या आरती संग्रह पुस्तकाच्या प्रकाशित मुद्रेवर अग्रस्थानी शेकाप ज्येष्ठ नेत्यांच्या छायाचित्रसाहित माणगांव तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती युवानेते निलेश थोरे यांचा अलिबाग पंचायत समिती  सदस्या रचना निलेश थोरे यांचे छायाचित्र व पुस्तकाच्या मागील बाजूस कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण  व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती संदेश देण्यात आलेले आहेत.आणि या आरती संग्रहाचे प्रकाशक म्हणून दीपक थळकर व प्रदिप लांगे या उतेखोल गावातील ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नानासाहेब सावंत, संजय पंदेरे व अण्णासाहेब आंबूर्ले, यांनी युवा नेते निलेश थोरे यांचे कोविड १९ काळातील व कोकणातील निसर्ग चक्रीवादळ व महाडमध्ये पूरपरिस्थिती केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले व आता आमचे काम ज्या युवा नेत्याने स्वतःचे नाव न दाखविता पक्ष कसा मोठा होईल अशा पध्दतीने गेले ५ ते ६ वर्ष मेहनत घेऊन काम केले त्याच्या पाठीशी राहणे आमचे कर्तव्य आहे.असे गौरवोद्गार काढले. युवा नेते निलेश थोरे यांचे या स्तुत्य उपक्रमाबाबत माणगांव तालुक्यातील कौतुक होतच आहे. आणि या कार्याक्रमाला शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेठ पाटील व शेकाप ज्येष्ठ नेते अस्लमभाई राऊत यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या व कौतुकाची थाप देखील दिली.

Popular posts from this blog