पेण तालुक्यात भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून ३०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

पेण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पेण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, ॲड. विकास म्हात्रे यांच्या नेतृत्वखाली तरणखोप सरपंच अभिजीत पाटील, हमरापुर सरपंच प्रदीप म्हात्रे, कोप्रोली सरपंच विकास म्हात्रे, प्रभाकर लांगी यांच्यासह ३०० कार्यकर्तांनी पेण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात जाहिर प्रवेश केला. यावेळी खासदार सुनीलजी तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शाल देऊन स्वागत केले. 

यावेळी व्यासपीठावर आमदार अनिकेतभाई तटकरे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत, पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्रदादा ठाकुर, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकुर, जिल्हा सरचिटणीस जगननशेठ म्हात्रे, माजी नगराध्यक्ष संतोष श्रुंगारपुरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बंड्याशेठ पाटील, जिल्हा चिटणीस परशुराम पाटील, जिल्हा लीगल सेल अध्यक्ष मंगेश नेने, शरद कदम, महेंद्र पोटफोडे, नगरपालिका गट नेत्या वसुधा पाटील, महिला अध्यक्षा चैतली पाटील, शहर महिला अध्यक्षा सुचिता चव्हाण, जिल्हा महिला उपाध्यक्षा शालीनी सावंत, जिल्हा महिला चिटणीस मिनाक्षी पाटील, शहर उपाध्यक्ष विशाल बाफना, तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील यांच्यासह नगरसेवक, सरपंच, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी कोप्रोली, सोनखार, हमरापुर, तरणखोप, वाशी, बोरी, हनुमानपाडा, कोपर, बोर्झे व तालुक्यातील असंख्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार सुनीलजी तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, तालुकाध्यक्ष दयानंद भगत ॲड. विकास म्हात्रे, हमरापुर सरपंच प्रदीप म्हात्रे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील यांची भाषणे झाली.

Popular posts from this blog