पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्यात विविध कार्यक्रम संपन्न

रोहा (रविना मालुसरे) : पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते आज रोहा तालुक्यात विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमीपूजनही संपन्न झाले.

सर्वप्रथम रोहा येथील मारुती चौकात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत फिरते वाहन विक्री केंद्र वाटपाचा कार्यक्रम पालकमंत्री कु.तटकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गरजू लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या उद्योग विभागामार्फत या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असून युवक-युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे.

यानंतर केळघर येथे गणपती विसर्जन घाट रस्ता कामाचे उद्घाटन तसेच सामाजिक सभागृहाचे भूमीपूजनही पालकमंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यानंतर त्यांच्या हस्ते भालगाव येथील पिण्याच्या पाण्याचे टाकीचे व पाईपलाईनच्या कामाचे आणि खाजणी येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्षा सौ. रिदवाना शेटे, नगरसेवक महेश कोल्हटकर, समीर सकपाळ, श्रीमती आफरीन रोगे, मयूर पायगुडे, सचिन चाळके, संतोष पवार, इतर स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते.

Popular posts from this blog