अंकुश जाधव राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित 

रोहा (समीर बामुगडे) : शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटी संस्थापक अध्यक्ष श्री. सतिश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली १६ वर्षे कार्यरत असलेले निवी गावचे सुपुत्र अंकुश न. जाधव यांना श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने श्री साई शिक्षकरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले. 

श्री. अंकुश जाधव हे दिव्यांग असूनही त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांच्या उत्कृष्ठ अशा कार्याची दखल घेऊन विविध सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांना आदर्श शिक्षक, वृक्षमित्र, काव्यभूषण, ज्ञानभूषण, समाजरत्न, समाजभूषण, उत्कृष्ठ समालोचक, उत्कृष्ठ निवेदक असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 

श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या १६ वा वर्धापन दिन व राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त श्री. अंकुश जाधव यांना शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला आहे. ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक, मित्र परिवार, तसेच  सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular posts from this blog