नागोठणे-पोयनाड रस्त्यावर मोकाट गुरांचा मुक्त संचार, वाहनचालकांना ठरतेय डोकेदुखी!

नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : नागोठणे-पोयनाड रस्त्यावर बेणसेवाडी ते कुहिरे दरम्यान मोकाट गुरांचा ठिकठिकाणी रस्ता रोको पाहायला मिळत आहे. मात्र वाहनचालकांना मार्गक्रमण करताना डोकेदुखी ठरत आहे. या समस्येमुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

नागोठणे ते पोयनाड दरम्यान नेहमी दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ चालू असते. परंतु मोकाट गुरांचा वावर ठिकठिकाणी ठिय्या मांडून बसलेला असतो. पावसाळ्यात शेतीची कामे झाल्यानंतर गुरांना मोकाट सोडली जातात. ही गुरे रस्त्याचा आधार घेऊन ठाण मांडून बसलेली असतात. अशातच ह्या रस्त्यातून जाणाऱ्या वाहनचालकांस मार्ग काढतांना दमछाक उडते. जर एखादा अपघात घडला तर त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल वाहनचालक व प्रवाशांकडून केला जात आहे.

Popular posts from this blog