माणगांवमध्ये वाहतूक पोलीसांच्या मदतीला छत्रपती करिअर अकादमीचे पोलीस स्वयंसेवक

माणगांव बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत

माणगांव (प्रमोद जाधव) : कोकणात मोठया उत्साहात साजरा केला जाणारा सण म्हणून गणेशोत्सव सणाकडे पाहिले जाते. आणि यावर्षी गणेश चतुर्थी १० सप्टेंबरला असल्याने साधारणतः ३ ते ४ सप्टेंबर पासून कोकणी चाकरमानी मुंबई पुणे, सुरत, बडोदा यांसारख्या शहरातून मूळगावी परतू लागले. दरवर्षी गणेशोत्सवा दरम्यान निर्माण होणारी अडचण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी! मात्र यावर्षी रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून आले.

तसेच भौगोलिकदृष्ट्या माणगाव हे शहर रायगड जिल्हयाच्या माध्यस्थानी येते आणि मुंबई-गोवा महामार्गाला माणगांव शहरातून बाह्यवळण दिले असले तरी काम अजून पूर्ण झालेले नाही आणि जुना महामार्ग माणगांव शहराच्या मध्यातून जातो आणि माणगांव बाजारपेठ देखील हायवेवरच वसलेली आहे. त्यामुळे बहुतांशी उत्सवाच्या वेळी माणगांव बाजारपेठेत वाहतूक कोंडी अटळ असते. याकरिता माणगाव पोलीसांकडून यावर्षी नियोजनबद्ध कार्यपद्धती अवलंबिण्यात आणि यातील विशेष म्हणजे माणगांव मध्ये वाहतूक पोलीस व महामार्ग पोलीस यांच्या मदतीसाठी माणगाव शहरातील छत्रपती करियर अकादमीचे विद्यार्थी पोलीस स्वयंसेवक म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर तैनात करण्यात आले आहेत.

माणगांव मध्ये सौ. माधुरी निवास साबळे संचालित छत्रपती करियर अकादमी नावाची प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या अकादमीच्या माध्यमातून पोलीस, कमांडो भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते आणि आणि या अकादमीमध्ये पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करू पाहणाऱ्या तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील आणि राज्यातील अनेक युवक व युवती प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये वाहतूक नियंत्रण व नियोजन कसे असावे? या विषयावर भर देत व प्रशिक्षणासार्थी ना याचे प्रत्यक्षात आकलन व्हावे याकरिता अकादमी चालकांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाकरिता येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता स्वयंसेवक म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर तैनात करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात या छत्रपती करियर अकादमीच्या स्वयंसेवकांचा देखील मोलाचा हातभार लागत आहे.सुमारे २५ स्वयंसेवक मुंबई-गोवा महामार्गावर चोख सेवा बजावत आहेत. छत्रपती करियर अकादमीच्या या कार्याचे जिल्हा पोलीस प्रशासन व तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Popular posts from this blog