नागोठणे येथील अपघातात मृत पावलेल्या तरुणाच्या कुटूंबाला मदतीचा हात

नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : नागोठणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर काही दिवसापूर्वी तरुण व्यक्ती  रऊफ चिपळूणकर हा आपली मोटरसायकल घेऊन जात असताना एका ट्रकची धाडक लागताच तो तरूण जागीच ठार झाला.

अपघातात गरीब कुटूंबातील कुटूंब प्रमुख कमावत्या व्यक्तीचे  निधन झाले. हे वृत्त सर्वत्र पसरताच त्या वृत्ताची दखल घेत रायगड जिल्हा काँग्रेस आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी घरत यांनी मृत्यू पावलेल्या रऊफ चिपळूणकर यांच्या घरी जाऊन त्या कुटूंबातील सदस्यांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन करून त्या कुटूंबाला अर्थिक मदतीचा हात दिला.

त्यावेळी रायगड जिल्हा उपाअध्यक्ष  मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, उरण येथील अखलाक शिलोत्री, रोहा येथील समीर भाई सकपाळ, रोहा पं. स. सदस्य  बिलाल कुरैशी, मितेष कल्याणी, नागोठणे शहर अध्यक्ष अशपाक पानसारे, रोहा तालुका अल्पसंख्याक समाज अध्यक्ष याकुब सय्यद, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसारे, युवा कार्यकर्ते आदिल पानसरे, सद्दाम दफेदार, रमिज दफेदार, उपस्थित होते.

Popular posts from this blog