रोहा तालुक्यातील उसर परिसरातील बेकायदा खैर तस्करीचा अड्डा उध्वस्त!
रोहा (समीर बामुगडे) : रोहा तालुक्यात उसर परिसरात खाजगी क्षेत्रात बेकादेशीर सोलीव खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. उसर परिसरात चालणाऱ्या खैरच्या तोडीबाबत वनविभागाशी दूरध्ननी वरुन संपर्क साधला आणि वनविभागाच्या टिमने जागेवर येऊन खैर तस्करीचा अड्डा उध्वस्त केला असून बेकायदेशीर खैर तोड करणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा जप्त केलेला माल सुडकोली विक्री अगार येथे जप्त करुन ठेवण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक रोहा श्री. अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजीत जाधव तसेच निर्मुलन अतिक्रमण पथकाचे प्रमुख इच्छांत कांबळी, गोफण वनपाल निलेश वाघमारे, वनरक्षक फिरते पथक अजिंक्य कदम, वनरक्षक तेजेश नरे, वनरक्षक संतोष पिंगळा, वनरक्षक वैभव बत्तीसे या पथकाने अवैध वृक्षतोडीचे खैर सोलीव नग ५८ घ.मी ०.५२५ किंमत ७३१२ रुपये इतका माल जप्त केला असून पुढील तपास विश्वजीत जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.