मांदाडकरांचा पाणीपुरवठा सुरळीत; पाण्याच्या टाकीचे भाजपा आमदार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
'रमेशदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है' च्या जयघोषाने मांदाड कोळीवाडा दुमदुमला!
तळा (संजय रिकामे) : वर्षानुवर्षे सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी वंचित असलेल्या मांदाडकरांना आता सुरळीत पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अखिल भारतीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा विधान परिषद आ. रमेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवुन नवीन पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे मांदाड भागात पाण्याची साठवणुक आणि वितरण चांगल्या प्रकारे होणार आहे. पाण्याच्या टाकीमुळे या भागात भविष्यात 24 तास पाणी पुरवठ्याचे वितरण करता येणार आहे.
पाण्याच्या टाकीचे लोकार्पण झाल्यानंतर मांदाड ग्रामस्थांच्या वतीने आ. रमेशदादा पाटील यांचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास कोळी महासंघाचे सचिव श्री. दबके, भाजपा मच्छीमार सेल प्रदेश अध्यक्ष ॲड. चेतन पाटील, भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, तळा तालुका माजी अध्यक्ष कैलास पायगुडे, माांदाड ग्रामस्थ आदि मान्यवर उपस्थित होते.
आ. रमेशदादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आजच्या या सत्काराने मी भाारावुुुन गेेेेलो आहे. गेली अनेक वर्षे येथील लोकप्रतिनिधी पाण्यासारखी मुलभुत सुविधा सर्व सामान्य जनतेला देत नाही ही खुपच खेदाची गोष्ट आहे. मी तुम्हाला माझ्या आमदारकीचा निधी दिला म्हणजे मी तुमच्यावर उपकार केले असा कोणताही भाग नसुन ते माझे कर्तव्य आहे. माझ्या आया बहिणींच्या डोक्यावरिल हंडा मी खाली उतरवला याचे समाधान असुन अजुन विकासकामे करण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्यास कोळी बांधवांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता गेली पंधरा वर्षे अनेक राजकारणी, लोकप्रतिनिधी आले आणि गेले परंतु मांदाड वासियांचा पाण्याचा प्रश्न कोणीच सोडविला नव्हता चक्री वादळात कोणीही न सांगता आ.रमेशदादा पाटील आले आणि त्यांनी रहाटाड, मांदाड येथील नुकसानग्रस्तांची पाहणी केली आणि मदत करण्याचे केेेवळ आश्वासन न देता वचनपुर्ती केली त्यामुळे सर्व कोळी बांधव भारावून गेले होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे तळा तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते. विशेष करुन खाडी पट्ट्यातील गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले. सर्वत्र भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. या चक्रीवादळाचा फटका खाडी शेजारी असणाऱ्या कोळी बांधवांना देखील मोठ्या प्रमाणात बसला होता कोळी बांधवांचे पूर्ण कंबरडेच मोडले होते. तळा तालुक्यातील कोळी समाज बांधवांची चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची पाहणी आणि तातडीची मदत करण्यासाठी राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि विधानपरिषद भाजपा आ. रमेशदादा पाटील यांनी रहाटाड, मांदाड येथील नुकसानग्रस्तांची पाहणी दि. 21/6/20 रोजी केली होती. या दौऱ्या दरम्यान मांदाड येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची समस्या आ. रमेशदादा पाटील यांच्य्यासमोर माांडली होती. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येची तात्काळ दखल घेऊन रमेशदादा पाटील यांनी कमी वेळेत काम पूर्ण करुन मांदाड ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
तळा तालुक्यात विकासकामे करण्यासाठी अनेक विघ्न - ॲड. चेतन पाटील
निसर्ग चक्री वादळामुळे तळा तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झाले होते विशेष करुन खाडी पट्ट्यातील गावांना मोठे नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आ. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रायगड जिल्ह्यातील सर्व गावांना भेट देऊन पाहणी करुन मदत करण्याचे काम आम्ही केले. यावेळी मांदाड येथे पाण्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली. गेली अनेक वर्षे केवळ आश्वासनं येथील लोकप्रतिनिधी यांनी दिली पण ती पूर्ण केली नाही आणि आम्ही ज्यावेळी हे काम हाती घेतले त्यावेळी येथील काही पुढाऱ्यांनी काम होऊ नये यासाठी बरीच विघ्न आणली. परंतु प्रशासकीय अभ्यास तुमच्यापेक्षा आमचा जास्त असुन यापुढे देखील विकासकामे करणार असुन कोणीही विघ्न आणले तर खपवून घेणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. आज भारतीय जनता पार्टीने कोळी बांधवांसाठी हक्काचा आमदार रमेशदादा पाटील यांच्या रुपाने विधान परिषदेवर पाठविले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात कोळी महासंघाचे काम सुरु आहे विरोधी पक्ष नेते आ. देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण कामाला लागूया. त्याचबरोबर गावचा विकास करु असे त्यांनी यावेळी सांगितले.