तळा तालुक्यातील जुगार मटका तेजीत

नक्की आशिर्वाद कुणाचा? राजकारण्यांचा का पोलीसांचा?

माणगांव (प्रमोद जाधव) : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील    तळा शहरातील बस स्थानकाच्या शेजारी, व मच्छीमार्केट लगतच सुनील वाड यांच्या इलेक्ट्रिक सामान विक्रीच्या दुकानात राजरोसपणे पावत्या फाडुन कल्याण, मेन, डे महाराष्ट्र, नाईट महाराष्ट्र अशा प्रकारचा सर्व बाजाराचा मटका खुलेआम तळा तालुक्यात सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी तळा शहरात त्याच ठिकाणी रायगडचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली याच मटकाअड्ड्यांवर रायगड (अलिबाग) पोलीसांनी छापा मारला. काही तुरळक दिवसांकरिता हा मटका बंद करण्यात आला. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे च आहे.एक वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली छापा मारला जातो आणि धंदे काही दिवसांनंतर पुन्हा चालू होतात; मग याला नक्की पाठबळ कुणाचे? असा सवाल तळा तालुक्यातील सुजाण नागरिक करत आहेत.

छापे मारले जातात F.I.R. दाखल केले जातात. मग हे धंदे पुन्हा कसे सुरू होतात? असा सवाल आज ही लोकांच्या मनात पडलेला आहे. तळा तालुका हा तसा म्हणायचे तर इतर आसपास च्या तालुक्यांच्या तुलनेत गरीब नागरिकांचा तालुका आहे आणि यामध्येच येथील नागरिक अशा मटका जुगार यांसारख्या नादाला लागले तर त्यांची आर्थिक परिस्थिती अजून ढासळून जाऊ शकते अशी भीती देखील सुज्ञ नागरिकांकडून वर्तविली जात आहे. 

पण विशेष महत्वाचे म्हणजे ह्या धंद्याना नक्की पाठबळ कुणाचे? असा प्रश्न आज तळा तालुक्यात ऐरणीवर आला आहे.आणि या धंद्यांना संबंधित अधिकारी आणि राजकीय पक्षांचे नेते यांचे  राजकीय पाठबळ असल्याची खुमासदार चर्चा तळा तालुक्यात नाक्या नाक्यावर रंगली आहे. आता मात्र अश्याप्रकारच्या धंद्यावर पोलीस प्रशासन नक्की काय कारवाई करणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Popular posts from this blog