माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय कार्यालयांना भेट
शासकीय कार्यालयांत माहिती अधिकार पुस्तिका देऊन महत्व सांगितले
धाटाव/रोहा (किरण मोरे) : शासन परिपत्रक २०सप्टेबर २००८, १५ सप्टेंबर २००९ तसेच ५ मे २०१५ या अध्यादेशानुसार आज २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या कार्यालयांत साजरा करावा याची जाणीव म्हणून रोहा तालुक्यातील प्रांत, तहसिल, पंचायत समिती व पोलीस स्टेशन या तालुक्याच्या मुख्य ठिकाणी माहिती अधिकाराची पुस्तिका देऊन त्यांना आजच्या दिनाचे महत्व समजाऊन माहिती अधिकार दिन साजरा करावा असे सांगण्यात आले.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ कडू, संघटक प्रसाद मोरे, माहिती अधिकाराचे ज्येष्ठ कार्यकर्ते व आरे विभागातील विभाग प्रमुख एकनाथ मळेकर आदि उपस्थित होते.