उसर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था!
रोहा (समीर बामुगडे) : उसर गावाकडे जाणारा जिल्हा परिषद रस्ता खूपच खराब झाला असून हा रस्ता उसर गाव, तळवली, केलदवाडी, पांगलोली या गावांना जोडणारा आहे.
सदरच्या रस्त्याला वाहतूक करतेवेळी खूप त्रास तेथील स्थानिकांना होत असून जिल्हा परिषदेने ह्या रस्त्याची डागडूजी करणे आवश्यक आहे. पावसाळ्या अगोदर असलेले खड्डे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोधले सप्लायर व सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी दरवर्षी स्वखर्चाने भरले आहेत. परंतु आता पावसाळ्यात ह्या रोडची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. 4 ते 5 गावांना जोडणारा हा रस्ता असून जिल्हा परिषद कडून हा रस्ता होणे अपेक्षित आहे अशी मागणी तेथील स्थानिक नागरिकांची व खारगाव ग्रामपंचायत सदस्य उमेश सावंत यांनी केली आहे.