खारापटी येथील दिप्तेश पोकळे यांच्या निवासस्थानी सारखचौथीच्या गणपतीचे पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी घेतले दर्शन
रोहा (प्रतिनिधी) : रोहा तालुक्यातील खारापटी येथील सामाजिक कार्यकर्ते दिप्तेश विठ्ठल पोकळे यांच्या निवासस्थानी साखरचौथीचे गणपती विराजमान झाले असून हे पाचवे वर्ष असून या बाप्पाच्या दर्शनासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री कु. अदितीताई तटकरे यांनी यांनी येऊन दर्शन घेतले.
यावेळी पोकळे परिवाराकडून ताईंचे शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रोहा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. राजश्री राजेंद्र पोकळे, जयवंतदादा मुंढे युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राजेंद्रशेठ पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व रोहा तालुका कोळी समाज्याचे माजी अध्यक्ष धर्माजीशेट कोळी, तसेच खादी ग्रामोद्योगचे चेअरमन संदीपशेट चोरघे, सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पांडुरंग अडसुळे, उत्तम नाईक, नवनीत डोलकर, प्रमोद वाघमारे, ज्ञानेश्वर कोळी, राहुल पोकळे, प्रशांत पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.