डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने स्मशानभूमी रोठखूर्द येथे वृक्षारोपण
रोहा (समीर बामुगडे) : पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या वतीने रोहा श्री बैठकीतील कमीत कमी श्री सदस्यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक १६ सप्टेंबर २०११ रोजी स्मशानभूमी रोठखूर्द, रोहा येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण ठिकाणी सकाळी ९ वाजता श्री सदस्यांनी उपस्थित राहून ८३ वृक्षांची लागवड केली. प्रत्येक वृक्षाभोवती ग्रीननेट बांधण्यात आले. वृक्षारोपण करीत असताना श्री सदस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. वृक्षारोपण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पार पडला. वृक्षारोपणामध्ये आंबा, चिंच, जांभूळ, बेल, करंज, अशोका, बदाम, काजू, इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यांत आली. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमास ग्रामसेवक श्री दत्तात्रेय हरी सावंत, सरपंच सौ. गीता जनार्दन मोरे, उपसरपंच श्री. महेंद्र गोपिनाथ कांबळे, सदस्य श्री. सचिन मोरे तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ श्री. लिलाधर मोरे, श्री. रमेश मोरे, श्री. हरिश्चंद्र मोरे, श्री. लक्ष्मण मोरे, जनार्दन मोरे, राकेश मोरे, मंगेश मोरे, अमोल ढमाले व श्री. राकेश कर्णेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.