माणगांव वाहतूक शाखेतर्फे चालक दिनानिमीत्त चालकांचा गौरव
माणगांव : देशातील दळण-वळण क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक वाहन चालक असून त्यांची अनन्य साधारण भूमिका आहे. तसेच चालकांचे देशाच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. याबाबत चालक या घटकांचे गुणगौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या दिनानिमित्ताने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब व महाड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव वाहतूक शाखेमार्फत विविध वाहन चालकांचा चालक दिनानिमित्ताने श्रीफळ, गुलाबपुष्प, व मास्क देऊन गौरव करण्यात आला.
तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस श्री. लालासाहेब वाघमोडे, निवास साबळे, बापू शिंदे, महिला पोलीस हवालदार विमल ठाकूर इ. उपस्थित होते.