विळे पंचक्रोशी, पाटणूस पंचक्रोशी व साजे-रवाळजे परिसरात पाच दिवसांच्या गौरी गणपतींचे उत्साहात विसर्जन
पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील विळे पंचक्रोशी, पाटणूस पंचक्रोशी व साजे रवाळजे परिसरात उत्साहात गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. दिवसभरात पावसाने चांगली उघडीप दिली असल्याने विसर्जनात कोणताही अडथळा आला नाही.
विसर्जनात आदिवासी बांधवानी सुद्धा खूप गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीचा खालू बाजा, काही ठिकाणी ढोल ताशा तर काही ठिकाणी लेझीम चा ठेका, सम्प्रदायिक मंडळींनी भजन तर महिलांनी झिम्मा फुगडीचा खेळ करीत पारंपरिक पद्धतीचा अवलंब करताना दिसला विसर्जनाच्या गर्दीत फार कमी लोकांनी मास्कचा वापर केलेला दिसला. कदाचित गणपती बाप्पाच्या विसर्जनात गणपती बाप्पाच्या भक्ती पुढे कोरोनाने पूर्ती हार पत्करल्याचे चित्र दिसत होते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! या गजराने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. वरील सर्व ठिकाणचे मिळून जवळपास पाचशे गणेशमूर्ती व पन्नास गौरींचे अगदी उत्साहात विसर्जन करण्यात आले.