भिवंडीचा खैरतस्कर वनविभागाच्या जाळ्यात 

कोलाडमध्ये वनविभागाची धडक कामगिरी! 

रोहा (समीर बामुगडे) : मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड सुपर मार्केट जवळ अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक कोलाड येथे वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडला. 

सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास  भिवंडी येथील पडगा येथून चिपळूण सावर्डे येथे खैर भरून जाणारा ट्रक नंबर GJ15 - AT 7851 हा कोलाड येथील सुपर मार्केट जवळ वनविभाग अधिकारी दक्षिण रायगड भरारी पथक प्रमुख ईशांत कांबळी, अजिंक्य कदम, प्रविण शिंदे, किशोर पाटील, तेजस नरे व कोलाड वनविभागाचे कर्मचारी यांनी सापळा रचून पकडले असून वाहनचालक नजमुद्दीन याला ताब्यात घेतले असुन अधिक तपास कोलाड वनविभागाचे अधिकारी करीत आहेत.

Popular posts from this blog